मनव्यवस्थापन!




आहे त्याचा स्वीकार केल्यास नव्यान्नव टक्के चिंता पळुन जातात.
*वेदनांना विचारांपासुन तोडलं की चिंता पळुन जाते!*

*1) भुतकाळात घुटमळणे बंद करा –*

बसल्या बसल्या ना, आपल्या डोक्यात उगाच चक्र सुरु असते,
– “दहा वर्षांपुर्वी मी चांगला अभ्यास केला असता, तर आज मी ही खुप मोठ्ठा ऑफीसर राहीलो असतो.”
– “सात वर्षांपुर्वी मी प्लॉट घ्यायला हवा होता, तेव्हा मी सुवर्णसंधी सोडली.”
– “त्यावेळी मी त्यांच्याशी असे वागायला नको होते! खुप वाईट आहे मी!”
– “मी खुप कमी पगारावर काम करायला तयार झालो, मी असे नव्हते करायला पाहीजे.”
व्हायच्या त्या घटना घडुन गेल्या,
टाईममशीनमध्ये जाऊन ते काही बदलता येणार नाही, तेव्हा आता त्यावर विचार करुन फक्त आणि फक्त, आपली बहुमुल्य उर्जा, फालतुमध्ये खर्च होणार, त्यापेक्षा
*भुतकाळातल्या, ह्या सर्व चांगल्या वाईट घटना, विसरुन गेलेलं, बरं!

*2)इथे प्रत्येक जण अद्वितीय आहे! –*

बहुतांश दुःखांच मुळ हे तुलनेत असतं,

*ह्या जगात प्रत्येक गोष्ट एकमेवअद्वितीय आहे,*
गुलाब दिसायला सुंदर असतो, पण म्हणुन मोगर्‍याचं महत्व कमी होत नाही, त्याचा सुगंध ही त्याची ओळख! त्या दोघात डावं-उजवं अशी तुलना करता होईल का? प्रत्येक फुल अद्वितीय आहे.
आता यात डावं उजवं करुन, कशाला दुःखी व्हायचं! प्रत्येकाचा चेहरा एक दुसर्‍यापासुन वेगळा आहे, म्हणुन ह्या जगातली प्रत्येक व्यक्ती एकमेव अद्वितीय आहे, तुम्हीपण!..

*3) ‘आयुष्य कशासाठी’ याचं उत्तर शोधा. –*

आयुष्य भगवंताने आपल्याला दिलेली अनमोल भेट आहे,
आयुष्य सतत आनंदी राहण्यासाठी आहे, आयुष्य उत्साहाने भरभरुन जगण्यासाठी आहे, आयुष्य भव्यदिव्य स्वप्नं बघण्यासाठी आणि ती स्वप्ने मनमुरादपणे जगण्यासाठी आहे,
*आयुष्य आपल्या आणि इतरांच्या चेहर्‍यावर हसु फुलवण्यासाठी आहे!*

जीवनाचा प्रत्येक क्षण निष्पापपणे बागडण्यासाठी आहे, मनातले सर्व अपराधी भाव, भुतकाळ-भविष्यकाळ, काल्पनिक जबाबदार्‍यांचे ओझे, सगळे सगळे फेकुन द्या, मोकळे आणि रिते व्हा, प्रत्येक क्षणाला, निरापराध वृत्तीने, निरागसपणे सामोरे जा!

माणसाला तीन गोष्टी जास्त त्रास देतात, प्रत्येक दुःखाच्या मुळाशी ह्या तीन गोष्टी सापडतील,

अ) अपेक्षा
ब) अपुर्ण स्वप्ने,
क) ध्येयप्राप्ती नंतर येणारा रिक्तपणा!

*बहूदा आपण भला ऊसकी कमीज मेरे कमीजसे सफेद कैसी ! याच विचारात असतो.*
तो कसा सुखी आहे,
ती कशी मस्त जगते,
त्याच आयुष्य आरामशीर आहे,  माझ्याकडे हे का नाही, या अपेक्षेने, तुलनेने दु:ख्खी होत तर नाही ना !

बघा! किती गंमतीशीर आहे हे, समजा, एखाद्याचे लग्न होत नाही, तेव्हा तो किती परेशान असतो, उठता-बसताना, जेवताना, झोपताना एकच ध्यास असतो, लग्न-लग्न-लग्न! नकळत हाच विचार, चिंता बनुन, त्याच्या आत्म्याला डाचु लागतो, त्याच्या दुःखाचं कारण बनतं, मग हास्य गायब होतं, चित्त थार्‍यावर राहत नाही, चिडचिड वाढते. स्वप्नप्राप्तीकडे रोज वाटचाल करायची पण मनावर जखम न होवु देता!, ह्याला म्हणतात, सुखी जीवन!

आणि समजा, एके दिवशी लग्न झालेच, (प्रत्येकाचे होतच असते,) मग अचानक आयुष्यातले थ्रील खतम! पुन्हा सप्पक आयुष्य सुरु, जॉब लागु दे, जॉब लागु दे म्हणुन तळमळलो, आणि जॉब लागला, आता थोड्याच वर्षात त्या जॉबचा कंटाळा यायला लागतो, एक प्रकारचा रिक्तपणा येतो,

*आयुष्य कशासाठी? जीवनाचा निर्भेळ आनंद घेण्यासाठी, मनाच्या आकाशात हे उत्तर जेव्हा गवसेल, तेव्हा नैराश्य, उदासीनता जवळपास फटकणार पण नाहीत!*

*4) सेवा करणार्‍याला आत्मिक समाधान मिळते. -*

बघा! किती मजेशीर आहे हे,

– अगरबत्ती स्वतः हवेत विरुन जाते, पण वातावरणात एक प्रसन्न सुगंध पसरवते,
– दिव्याची वात स्वतः नष्ट होते, पण तेजाने घर उजळुन टाकते.
काहीतरी बनण्यासाठी, काहीतरी प्राप्त करण्यासाठी आपण सकाळ संध्याकाळ धावत असतो, पण खरे समाधान कुठे आहे?
आपल्यात असलेल्या गुणांचा, शक्तीचा वापर आजुबाजुच्यांना, नातेवाईकांना, मित्रांना, अगदी अनोळखी लोकांना सुखी, आनंदी बनवण्यासाठी करणार्‍यांचं जीवन खरं सार्थ झालं, असं म्हणता येईल.

ह्याच चार सुत्रांचा मिळुन बनतो,
*लॉ ऑफ अट्रेक्शन!*
मनाच्या तळाशी जाऊन सुखाचा शोध घेऊ पाहणारया, 
सगळ्यांचे आयुष्य, सुखी, समाधानी आणि समृद्ध होवो,
ह्या मनस्वी प्रार्थनेसह,

*धन्यवाद आणि शुभेच्छा!*
*तुमच आयुष्य शुभ जावो*


Avatar of netajay.com

Meet the Author: Netajay Netajay is a passionate storyteller, motivator, and information enthusiast dedicated to bringing you captivating narratives, inspiring insights, and valuable knowledge through Netajay.com. With a flair for weaving compelling tales and offering motivating perspectives, Netajay aims to ignite the spark of curiosity and drive positive change in the lives of readers. Whether it's through thought-provoking stories, uplifting motivational content, or insightful information, Netajay endeavors to inspire, educate, and empower individuals to reach their fullest potential. Connect with Netajay on social media: Twitter: @NetajayOfficial Instagram: @Netajay Facebook: @NetajayOfficial For inquiries, collaborations, or just to say hello, feel free to reach out to Netajay via email: contact@netajay.com

1 thought on “मनव्यवस्थापन!”

Leave a Comment