🐾 बोधकथा:
कमजोर ससा आणि जागरूक माकड
एका घनदाट जंगलात सिंहाची एक मोठी फॅक्टरी होती.
त्या फॅक्टरीत अनेक प्राणी राबत असत. पण प्रमुख दोन टोळ्या उठून दिसत:
🐰 सश्यांची टोळी
गप्प, फारसे प्रश्न न विचारणारे.
वर्षानुवर्षं काम करणारे.
कुणी काहीही सांगितलं की
“हो साहेब!” म्हणून मान डोलावणारे
“हो साहेब!” हेच त्यांचं कायम उत्तर –
ना तक्रार, ना प्रश्न.
वर्षानुवर्षं न बोलता राबण हे
त्यांचं तत्त्व:
“गप्प राहा, तर नोकरी टिकते.”
🐵 माकडांची टोळी
हुशार, जागरूक, नियम समजून घेणारी.
गरज पडली की हक्क मागणारी.
सगळ्यांच्या भल्यासाठी आवाज उठवणारी.
काम मात्र सगळ्यांचं सारखंच –
रोज राब राब राबायचं.
पगारही जेमतेम सारखाच.
फक्त दृष्टिकोन वेगळा.
नवा डाव
एका दिवशी सिंहाने जाहीर केलं:
“फॅक्टरी तोट्यात आहे. ती बंद करतोय.”
सगळे प्राणी हादरले.
पण काही आठवड्यांतच तीच फॅक्टरी नव्या नावाने पुन्हा उभी राहिली.
काम तेच. जंगल तेच.
फक्त नाव आणि कामाचे नियम अवास्तव.
सिंहाचं खरं गणित वेगळंच होतं…
“माकडांना ठेवायचं तर हक्क द्यावे लागतील –
सेवा, लाभ, पगार – सगळं वाढेल.”
“ससे गप्प आहेत. त्यांना ‘नवीन’ समजून कमी पगारात वापरता येईल.”
म्हणून ठरलं:
माकडांना फायदे देऊन बाहेर काढा
-सशांना ‘विश्वास’ देऊन वापरा
Fresh Appointment
सिंहाने सशांना हाक दिली:
> “तुम्ही खूप विश्वासू. आम्ही तुम्हाला नव्या फॅक्टरी ठेवतो.”
त्यांच्यासमोर Fresh Appointment ठेवलं.
ससे म्हणाले:
“माझ्यावर विश्वास आहे म्हणून मला ठेवलं!”
आणि ते गप्पच राहिले.
न कळलेला विश्वास…
ना वाचलेले कागद…
फक्त “हो” म्हणून पुन्हा ड्युटीवर हजर.
🤝 दुसरीकडे…
माकड विचारात होती:
> “आमची 15–20 वर्षांची सेवा कुठे गेली?”
“हक्काचा मोबदला नको का?”
त्यांनी इतर प्राण्यांना जागं केलं.
एकजुटीने प्रश्न विचारले.
सिंहाला अस्वस्थ वाटलं.
पण शेवटी…
सिंहाने माकडांना 18–20 लाखांचे सेवा लाभ देऊन बाहेरचा रस्ता दाखवला.
🧠 पण सत्य हे होतं:
🔹 माकड लढले – सन्मानाने बाहेर पडले
🔹 ससे गप्प राहिले – शोषित झाले
नवीन नोकरीत सश्यांच्या हाती काय आलं?
❌ जुनी सेवा नाही
❌ सेवालाभ नाही
❌ सवलत नाही
✅ जुनीच जबाबदारी
✅ दुप्पट ताण
✅ अपुरा पगार
तरीही ससे म्हणतात:
“आपल्यावर विश्वास आहेकी, म्हणूनतर आपल्याला ठेवले.”
📉 अंतिम स्थिती:
ससे अजूनही राबतायत.
माकड पुढे निघून गेलेत.
सिंहाने काय केलं?
🔹 माकड ‘त्रासदायक’ म्हणून बाजूला केलं
🔹 सशांना ‘विश्वासू’ म्हणून वापरलं
📌 तात्पर्य (बोध):
“गप्प राहणं हे चांगुलपणाचं लक्षण नसतं –
ते फसवणुकीचं साधन असतं.
जो भिडत नाही,
तोच वापरला जातो.”