पांडूरंगाची माळ घालणे म्हणजे काय ? ..🌷🚩🌷पांडूरंगाची माळ म्हणजे मुळात कोणतीही धार्मिक गोष्ट नाही.पांडूरंगाची माळ म्हणजे वरिष्ठांच्या प्रती आदरभाव असणे.पांडूरंगाची माळ म्हणजेच कनिष्ठांच्या प्रती करुणाभाव बाळगणे. पांडूरंगाची माळ म्हणजे आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये असं वागण. पांडूरंगाची माळ म्हणजे वेद वाचण्यापेक्षा वेदना वाचता येणे. पांडूरंगाची माळ म्हणजे आपलं काम प्रामाणिकपणे करणं.पांडूरंगाची माळ म्हणजे आपलं कौटुंबीक आणि सामाजिक कर्तव्य पार पाडणं.पांडूरंगाची माळ म्हणजे मुक्या प्राण्यांवर, पशु-पक्ष्यांवर प्रेम करणे.पांडूरंगाची माळ म्हणजे निरपेक्ष सत्कर्म करत रहाणे.पांडूरंगाची माळ म्हणजे नि:स्वार्थी सेवाभाव जोपासणे.पांडूरंगाची माळ म्हणजे सदैव कृतार्थ भाव अंगी बाळगणे.पांडूरंगाची माळ म्हणजे विना अपेक्षा कौतुक करणे.पांडूरंगाची माळ म्हणजे आपण प्रत्येकाशी सद्भाव आणि सद्भावाने रहाणे.पांडूरंगाची माळ म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत सदैव असणे. पांडूरंगाची माळ म्हणजे आपण या समाजाचं काही देणं लागतो, आणि ते आपण दिलेच पाहिजे अशी मानसिकता मनाशी सतत बाळगणे.पांडूरंगाची माळ म्हणजे गरजुवंतांना यथा शक्ती आर्थिक किंवा शाब्दिक मदत करणे. पांडूरंगाची माळ म्हणजे आपल्या बरोबर इतरांची देखील प्रगती होवो हा भाव अंगी असणे. पांडूरंगाची माळ म्हणजे साधं………सोपं……..सरळ………आणिनिर्मळ ……….असणं – दिसणं आणि वागणं. पांडूरंगाची माळ म्हणजे फक्त पूजा – पाठ, प्रार्थना आणि भक्ती नव्हे तर……पांडूरंगाची माळ म्हणजे केलेली पूजा – पाठ, प्रार्थना आणि भक्ती या प्रमाणेच आपली प्रत्येक कृती असणे.पांडूरंगाची माळ म्हणजे राष्ट्रपुरुष आणि राष्ट्रीय संताचं सदैव स्मरण असणे. थोडक्यात पांडूरंगाची माळ म्हणजे सकाळ पासून रात्री झोपे पर्यंत नित्य कर्म, कर्तव्य पारदर्शक पद्धतीने पार पाडणे .🙏🌷🚩🌷🙏
पांडुरंगाची माळ
Meet the Author: Netajay Netajay is a passionate storyteller, motivator, and information enthusiast dedicated to bringing you captivating narratives, inspiring insights, and valuable knowledge through Netajay.com. With a flair for weaving compelling tales and offering motivating perspectives, Netajay aims to ignite the spark of curiosity and drive positive change in the lives of readers. Whether it's through thought-provoking stories, uplifting motivational content, or insightful information, Netajay endeavors to inspire, educate, and empower individuals to reach their fullest potential. Connect with Netajay on social media: Twitter: @NetajayOfficial Instagram: @Netajay Facebook: @NetajayOfficial For inquiries, collaborations, or just to say hello, feel free to reach out to Netajay via email: contact@netajay.com