एका खेड्यात एक अनुभवी शेतकरी होता.
त्याच्याकडे जुनी शेती होती आणि त्यासाठी वर्षानुवर्षं राबणारे काही बैल.
त्या बैलांचा आणि शेतकऱ्याचा एक अघोषित स्नेहबंध होता —
कोणी कसले आदेश न देता, काम चालत असे.
बैल जाणते होते, शेत ओळखीचं होतं आणि
शेतकरीही कधी रागवला तर मायेने फटकारायचा,
पण मनात माया होती.
एके दिवशी शेतकऱ्याच्या मनात विचार आला —
“ही जुनी शेती विकून अधिक फायद्याकरीता नवीन बदल करावा तो ही मोठा, झगमगता!”
पण प्रश्न होता — बैलांचं काय करायचं?
त्याने एक योजना आखली —
“मी शेती विकतोय असं सांगतो,
पण खरी विक्री होतेय बैलांसकट!”
त्याने शेती आणि बैल एकत्रच एका श्रीमंत बागायतदाराला विकली.
नवीन मालकाने नांगर चालू ठेवला.
बैलं तीच, नांगर तीच…
पण आता जमिन वेगळी ,मालक वेगळा त्याचे नियम वेगळे.
नवीन बागायतदाराने फटके सुरु केले,आदेश देऊ लागला
तेव्हा बैलांनी आवाज उठवला:
“आमचं अनुभवाचं वर्षांनुवर्षांचं काम, जुनं नातं,
आमच्यावरचा जुना हक्क, हे सगळं गृहीत धरलं जावं!”
पण नवा मालक म्हणाला —
> “मी शेती विकत घेतली आहे, बैल नाही.
तुमच्यावर जुना काही हक्क नाही.
इथे तुम्ही नव्याने आहात, जुनं विसरा.”
बैलांना तेव्हा समजलं की —
> जुना शेतकरी मायेचा नव्हता,
तोही फक्त आपला वापरच करत होता.
कारण त्याने आपल्याला शेतीसकट विकून टाकले होते आपल्यासकट शेती नाही !
तात्पर्य:
> शेतीसोबत विकले गेलेले बैल,
नवा मालक बदलतो, पण उपयोग तेच ठेवतात.
हक्क मागितले, तर सांगतात — ‘बैल विकले नव्हते!’
> आवाज नसेल, तर अनुभवाची किंमतही राहत नाही.
जुना मालक गेला, पण आपली किंमतही घेऊन गेला!