एका सर्कशीत एक प्रचंड मोठा हत्ती रोज शिस्तीत उभा असायचा. त्याच्या पायाला फक्त एक पातळ दोरी बांधलेली असायची — ती दोरी सहज तोडून तो निघून जाऊ शकत होता.
पण… हत्ती कधीच तिथून हलत नसे.
एका माणसाने व्यवस्थापकाला विचारले,
“इतक्या मोठ्या हत्तीला ही साधी दोरी का थांबवते?”
व्यवस्थापक हसून म्हणाला,
“जेव्हा हा लहान होता, तेव्हा त्याच्या पायाला हीच दोरी बांधली होती. तेव्हा त्याने खूप प्रयत्न केले पण सुटू शकला नाही.
हळूहळू त्याला वाटू लागलं की ही दोरी तोडणं अशक्य आहे… आणि आता जेव्हा तो सहज सुटू शकतो,
तेव्हाही तो सुटायचा प्रयत्नच करत नाही… कारण त्याच्या मनात तो अजून ‘गुलाम’ आहे.”
—
तात्पर्य:
> “ज्यांनी लहानपणापासून गुलामी स्वीकारली — त्यांना स्वातंत्र्य हवं असतंच असं नाही.
जेव्हा कर्मचाऱ्यांना वाटतं, ‘मालक जे देईल तेच आपलं भाग्य’ — तेव्हा ते आपले हक्क गमवतात आणि गुलामीचं बंधन पुन्हा पक्का करत जातात.”