माणुसकी- घरातील तिजोरी आहे.
गोड शब्द- घरातील धनदौलत आहे.
शांतता – घरातील लक्ष्मी आहे.
आत्मविश्वास- घरातील देवस्थान आहे.
संताजी||
दुजाभाव विसरणे – घरातील तेजस्वी समई आहे.
पैसा – घराचा पाहुणा आहे.
गर्विष्ठपणा – घराचा वैरी आहे.
अहंकार – घराचा सर्वनाश आहे.
आतिथ्य – घराचे वैभव आहे.
नम्रता – घराची प्रतिष्ठा आहे.
व्यवस्था – घराची शोभा आहे.
समाधान – घराचे सुख आहे.
सदाचार – घराचा सुगंध आहे.
चारित्र्यसंपन्नता – घराची किर्ती आहे.
प्रभुचा वास – अशाच घरात नेहमी आहे.
कर्ज – होईल असा खर्च करु नका.
पाप – होईल अशी कमाई करु नका.
दुःख – होईल असे बोलु नका.
चिंता – होईल असे जीवन जगू नका.
रोग – होईल असे खाऊ नका.
जगा इतके की आयुष्य कमी पडेल.
हसा इतके की आनंद कमी पडेल
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे
पण प्रयत्न इतके करा की
परमेश्वराला देणे भागच पडेल
निती हरपली, बरकत संपली। माझे बुडवशील, तु बुडशील।