💭 शनिच्या दगडावर महागडे लाखो लिटर तेल वाया जरी गेले तरी चालेल; पण हातावरचा चिमुटभर प्रसादाचा कण सुध्दा जमिनीवर पडला नाही पाहिजे…
💭 दलित-आदिवासींची मुलं अन्न पाणी व दुधावाचून कुपोषणाने मेली तरी चालतील; पण शंकराच्या दगडी पिंडींला लाखो लिटर दूधाने आंघोळ घालून धुतलेच पाहिजे…
💭 रेशनवर गरिबांना तांदूळ नाही मिळाले तरी चालतील; पण लग्न कार्यामध्ये अक्षता म्हणून हजारो टन तांदूळ उधळलेच पाहिजे…
💭 चपातीला तुप नसले तरी चालेल; पण गुजरात मधील मंदिरामध्ये पायाखाली लाखो लिटर घी तुडवलेच पाहिजे…
💭 मुलांच्या शाळेला फी भरायला पैसा नसला तरी चालेल; पण मंदिराच्या दानपेटी मार्फत ब्राह्मणांना करोडो रुपयांचा मलिदा महिन्याला पोहोचलाच पाहिजे…..
💭 कुंभ मेळयात नागड्या साधूंनी धुमाकूळ घातला तरी चालेल; पण आपल्या शिकलेल्या मुलींना, आया-बहिणी व सुनेला त्या नागड्या साधूंचे आशिर्वाद मिळालेच पाहिजे…
💭 हंडाभर पाण्यासाठी मैलो न मैल आया-बहिणीची ऊन्हातान्हात पायपीट झाली तरी चालेल; पण देवा धर्माच्या नावाखाली तलाव नद्या दूषित केलेच पाहिजेत…
💭 शरीर अशक्त झाले तरी चालेल; पण दर आठवड्याचे उपवास केलेच पाहिजेत…
💭 घराच्या चार भिंतीसाठी लाखाचे कर्ज काढले तरी चालेल; पण सुखशांतीसाठी सत्यनारायण घातलाच पाहिजे…
💭 आया बहिणींची अब्रू लुटली गेली, हुंड्यासाठी छळ झाला तरी चालेल; पण आपण ‘तिचे नशीबच फुटके’ असे म्हणत शांत बसले पाहिजे…
💭 उच्च शिक्षण घेणाऱ्या व शाळेत शिक्षण घेत असलेल्या मुलांच्या अभ्यासाचे नुकसान झाले तरी चालेल; पण लग्न कार्यात तसेच सणासुदीला डिजे ढोल ताशे वाजवून परिसर दणाणून सोडलाच पाहिजे…
💭 महाग खतबियाणं आणि पाणीपावसाला पारखा होऊन कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याने आत्महत्या केली तरी चालेल; पण शेतकऱ्यांची सतत फसवणूक करून पंचतारांकित हॉटेलात जेवणाऱ्या त्याच त्याच पक्ष नेत्यांना सतत निवडून दिलेच पाहिजे…
💭 म्हातारे-कोतारे, आजारी-पाजारींना, तान्ह्या बाळांना आवाजाचा त्रास झाला तरी चालेल; पण दिवाळीत प्रदूषण वाढवणारे फटाके वाजलेच पाहिजेत…
💭 ट्राफिक जाम होऊन देशाचे नुकसान झाले तरी चालेल; पण करोडो रुपयाची उधळण करणारे गणेशोत्सवाचे मांडव रस्त्यावर लागलेच पाहिजेत, नवरात्रीचा गरबाही झालाच पाहिजे…
💭 तरूण मुले विविध नशा करून बिघडली तरी चालतील; पण कुठल्याही उत्सवी मिरवणुकीत व निवडणुकीच्या विजयी मिरवणुकीत मुले नाचायला पाठवलीच पाहिजेत…
💭 जातीपाती मध्ये विभाजित राहून एकमेकांचे जीव घेतले तरी चालतील; पण स्वार्थी नेत्यांपुढे व पाखंडी धर्ममार्तंडांपुढे झुकलेच पाहिजे…
💭 मित्रांनो, केव्हा थांबणार हे बिनडोकपणे वागणे? बस झाली स्वत:चीच फसवणूक करून घेणे. आता अंधश्रद्धा बागळणे थांबवा. सर्व जाती धर्माच्या बंधू भगिनींनो, आपण विकृत प्रथांना तिलांजली दिलीच पाहिजे. सक्षम देश उभारणीसाठी आता अंधश्रद्धा विरोधी लढ्याला साथ दिलीच पाहिजे… बरोबर ना?✍🏽JK