🍁 🌹
*देव मानावा की मानू नये*
*या भानगडीत मी पडत नाही,*
*आपल्या मान्यतेवाचून*
*देवाचं काही अडत नाही..!*
*ज्यांना देव हवा आहे*
*त्यांच्यासाठी तो श्वास आहे,*
*ज्यांना देव नको आहे*
*त्यांच्यासाठी तो भास आहे,*
*आस्तिक नास्तिक वादात*
*मी कधीच पडत नाही,*
*आपल्या मान्यतेवाचून*
*देवाचं काही अडत नाही..!*
*हार घेऊन रांगेत कधी*
*मी उभा रहात नाही,*
*पाव किलो पेढ्याची लाच*
*मी देवाला कधी देत नाही,*
*जो देतो भरभरून जगाला*
*त्याला मी कधी देत नाही,*
*आपल्या मान्यतेवाचून*
*देवाचं काही अडत नाही..!*
*जे होणारच आहे*
*ते कधी टळत नाही,*
*खाटल्यावर बसून*
*कोणताच हरी पावत नाही,*
*म्हणून मी कधी*
*देवास वेठीस धरीत नाही,*
*आपल्या मान्यतेवाचून*
*देवाचं काही अडत नाही..!*
*देव देवळात कधीच नसतो…*
*तो शेतात राबत असतो,*
*तो सीमेवर लढत असतो,*
*तो कधी आनंदवनात असतो,*
*कधी हेमलकसात असतो,*
*देव शाळेत शिकवत असतो, तो अंगणवाडीत बागडत असतो, तो इस्पितळात शुश्रूषा करीत असतो, म्हणून…*
*ह्यांच्यातला देव मी कधी नाकारत नाही,*
*आपल्या मान्यतेवाचून*
*देवाचं काही अडत नाही..!* 🙏
_वि. वा. शिरवाडकरांची